Relationship of agriculture with life.शेतीचे जिवनाशी नाते.
Relationship of agriculture with life.शेतीचे जिवनाशी नाते.
भारत हा कृषीप्रधान देश ,आपल्या देशातील 80 टक्के लोक आज या ना त्या निमित्ताने शेतीशी म्हणजे जमिनीशी संबंधित आहे.
अन्नधान्य फळे भाजीपाला दूध व खाण्याशी संबंधित सर्व पदार्थ जमिनीपासूनच उपलब्ध होत असल्याने एका अर्थाने सगळ्या लोकांचा जमिनीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना पण संबंध आहेच
मानवाला सर्वात मोठी धोक्याची गोष्ट जर कोणी असेल तर ती म्हणजे जमिनीपासून वेगळी केली जाणे, ज्याप्रमाणे प्रत्येक वृक्षाचे मूळ जसे जमिनीत असते तसा प्रत्येक मनुष्याचा संबंध जमिनीशी असलाच पाहिजे.
जमिनीपासून वेगळा केलेला मनुष्य मानसिक आजाराने पीडित होतो असा काही शास्त्रांचा अभ्यास निष्कर्ष आहे त्यामुळे मनुष्याचे जीवन जितके पूर्ण होईल तितका तो सुखी होईल भूमी सेवा पूर्ण जीवनाचे एक अनिवार्य अंग आहे.
Relationship of agriculture with life.शेतीचे जिवनाशी नाते.
शेतीमुळे मोकळी हवा सूर्यप्रकाश मिळतो चांगला आरोग्य लाभ होऊन मानसिक आनंद मिळतो शेतीतून जे जे काही उत्पादित होते ती सर्जनशील निर्मितीच असते या निर्मितीने मिळणाऱ्या समाधानाची किंमत करता येत नाही शिवाय बुद्धीही तीव्र होतेच तेव्हा थोडक्यात शेती परमेश्वर सेवेचे सर्वात मोठे साधन आहे.
जितक्या लोकांना पूर्ण जीवनाची संधी मिळेल तितकी समाजात शांती व समाधान नांदेल. म्हणून प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकाराने का होईना पण जमिनीशी ,शेतातल्या कष्टाशी संबंध ठेवला पाहिजे.
Comments
Post a Comment